उस्मानाबाद / प्रतिनिधी
कोरोनाच्या सावटामुळे यंदा शहरातील गवळी गल्लीत शतकानुशतकापासून श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त दहिहंडी फोडणे उत्सव यावर्षी होणार नाही ही परंपरा खंडित होणार आहे.देशात व राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.शासनाचे आदेश व नियमाचे पालन करणे.संसर्गाची साखळी तोडणे,गर्दी  न होऊ देणे,मास्कचा वापर,स्वच्छता ठेवा,घरातच रहा,सुरक्षित रहा,कोरोनाचे सावट,विषाणूचे फैलावणे हे टाळण्यासाठी.यावर्षी श्रावणाच्या पावसाच्या सरीत, पडत्या पावसाने व टाकल्या जाणारया पाण्याने भिजत " "गोविंदा आला रे "या गाण्यावर नाचून थरावर थर चढविण्याचा व दहिहंडी फोडण्याचा आनंद घेता येणार नाही.या आनंद उत्सवात बालगोपाल मुला मुलींचा,महिलांचा व जेष्ठ नागरिकांचा सहभाग गोपालकाल्याचा प्रसाद घेण्याचा आनंद यास मूकणार.आपआपल्या घरी रहा,सुरक्षित रहा. कोरोना योध्द्यांचा सन्मान व सलाम करू.भगवान श्रीकृष्णाकडे प्रार्थना करू,कोरोनाचे सावट लवकर हटू दे आनंदी व उत्सवपूर्ण जीवन जगण्याची संधी दे.गोपाळानो गोविंदानो घरातच राहून उत्सव साजरा करा.गवळी गल्लीत 
दहिहंडी उत्सव संपन्न होणार नाही असे संयोजकाने विनंती केली आहे.
 
Top