उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तीन ऑगस्ट संस्कृत दिन विविध स्पर्धा घेऊन संपन्न झाला शहरातील विवेकानंद केंद्राचे संचालक प्रा. शामराव दहिटणकर , निलेश कुलकर्णी प्रथम विवेकानंद प्रतिमेचे पूजन केले. यानंतर कोरोना या महामारी चे नियम पाळून सुभाषित पठण, श्रीमद् भागवत गीतेचा पंधरावा अध्याययाचे पठण ,आद्य शंकराचार्य वीरचित्र निर्वाणाष्टके, कौपिन पश्चक स्तोत्र, श्री गणेश अथर्वशीर्ष व गणपती स्तोत्र याचे विद्यार्थ्यांनी पठण केले.
दरम्यान घेण्यात आलेल्या स्पर्धेत बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्राचे संचालक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय गायकवाड यांच्या हस्ते विजेते  सत्यहरी शेषनाथ वाघ,   विशाखा संभाजी बागल, सार्थकी वाघ, अर्णव शतानंद दहिटणकर स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे पुस्तक रूपी बक्षीस देण्यात आले व मार्गदर्शन केले. त्यानंतर अभिजीत देशपांडे,  प्रा. दहिटणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केल.े
कार्यक्रमास विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते ऋषिकेश जयकर, लक्ष्मीकांत जहागीरदार, समर्थ कुलकर्णी , उपगुप्त वाघमारे  व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार लक्ष्मीकांत जहागीरदार यांनी मानले. 
 
Top