उस्माना
बाद /प्रतिनिधी-
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे जिल्हयात  गेल्या पाच वर्षापासून बंद होती या योजनेला सुरू करण्यासाठी खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. कैलास घाडगे पाटील यांनी नागपूर आयुक्त् यांच्याशी वारंवार संपर्क करून योजना सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला, त्यानुसार आजतागायत जिल्हयातील भूम तालुक्यात 13, कळंब तालुक्यात 12, लोहारा तालुक्यात 29, उमरगा तालुक्यात 5, उस्मानाबाद तालुक्यात 9, परंडा तालुक्यात 34, तुळजापूर तालुक्यात 61 व वाशी तालुक्यात 1 अशा एकूण 164 ग्रामपंचायतीत कामे सुरु झाली आहेत. 
महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या गावपातळीवरील गरजूंसाठीची योजना आहे. स्थानिक पातळीवर अधिकाधिक रोजगार निर्मिती, गरजू हाताला काम देण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न करून जिल्हयातील सर्व 734 ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक काम सुरु करण्याबाबत वेळोवेळी संबंधितांस सुचविण्यात आले होते. 
तसेच जिल्हयातील सर्व गावात किमान एक काम सुरू करत असताना या कामांबाबत सर्व अधिकारी यांनी सतर्कतेने काम करावे, सर्व अधिकारी वर्गाने या कामात नियोजनबध्दता आणावी तसेच यापुढे या योजनेची जास्तीत जास्त कामे प्रत्येक गावात विनातक्रार होण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देशित केले असताना देखील 734 ग्रामपंचायतीपैकी 164 ग्रामपंचायतीत कामे सुरु झाली असल्याने जिल्हयातील ज्या ग्रामपंचायतीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामाला सुरुवात झाली नाही अशा ग्रामपंचायतीशी संबंधित गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असे पत्र खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिले आहे. 
 
Top