तेर/प्रतिनिधी :-
दारासमोर लघवी केली म्हणून पारधी समाजाच्या 20 वर्षीय युवकांचा खून झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील बूकनवाडी येथे 19 आँगष्टला दुपारी घडली.
उस्मानाबाद तालुक्यातील बुकनवाडी येथील सुरेश अरूण काळे याने बुकनवाडी येथील एका स्ञीच्या घरासमोर लघवी केली म्हणून त्याचा राम मनात धरून यातील आरोपी पांडूरंग छगन वाकुरे,बालाजी छगन वाकुरे,पोपट छगन वाकुरे,योगेश अरूण वाकुरे,समाधान हरीभाऊ वाकुरे,अंकूश इंद्रजित बुकन सर्व रा.बुकनवाडी यानी जिल्हादंडाधिकारी उस्मानाबाद यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमवून 19 आँगष्ट ला दुपारी एक च्या सुमारास बुकनवाडी शिवारात रेल्वे पटरीचे पलिकडील गायरान शेतात शिवीगाळ करून लाथाबूक्यानी मारहान करून त्याचा दोरीने गळा आवळून खून करून त्याचे प्रेत  लिंबाच्या झाडाला लटकावले अशी फिर्याद रूक्मीन अरूण काळे यांच्या फिर्यावरून ढोकी पोलिस स्टेशनला आरोपीविरूद्ध 220/2020 कलम 302,201,143,147,149,323 भा.द.वि.म.पो.का.कलम 135 अ.जा.ज.अ.प्र.का 3(2)(v) अन्वये गून्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील करीत आहेत.

 
Top