उस्मानाबाद / प्रतिनिधी-
उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर शुक्रवारी रूजू झाले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडून पदभार त्यांनी पदभार स्वीकारताच गणेशभक्तांसाठी गणेशोत्सव काळातील दोन शनिवारचा जनता जनता कर्फ्यू रद्द केल्याचा आदेश जारी करून गणेशभक्तांना मोठा दिलासा दिला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदावर बदली झालेल्या दीपा  मुधोळ-मुंडे यांनी दिवेगावकर यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम शेगुलवार, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशिला देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत संजय तुबाकले, तहसीलदार गणेश माळी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात दर शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जातो. मात्र शनिवार, 22 ऑगस्ट रोजी गणेश आगमन असल्याने नागरिकांना गणेशमूर्ती व अन्य पूजाविधी व सजावटीचे साहित्य खरेदीसाठी शनिवारचा जनता कर्फ्यू रद्द केला आहे. गणेश विसर्जन कालावधीत येणार्‍या दुसर्‍या शनिवारी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजीचा देखील जनता कर्फ्यू शिथील केला आहे. या दोन दिवशी बाजारपेठ नेहमीप्रमाणे नियमांचे पालन करून सुरू ठेवण्यास मूभा देण्यात आली आहे.
 
Top