उस्मानाबाद/प्रतिनिधी
जिल्ह्यात कोविड - १९ संबंधी प्रशासनाने काढलेल्या मनाई आदेशांचे उल्लंघन करून तसेच तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकून कोविड- १९ संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या १५४ जणांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून ३० हजार ८०० रुपयांचा दंड वसूल केला.
 ही कारवाई पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या आदेशानुसार जिल्हाभरात विशेष माेहीम राबवून करण्यात आली. यामध्ये उस्मानाबाद शहर ठाण्यांतर्गत-१४, उस्मानाबाद ग्रामीण-४१, बेंबळी - ९, तुळजापूर-९, तामलवाडी - २८, उमरगा - ९, कळंब - १, ढोकी- ५, येरमाळा -५, शिराढोण -२१, भुम -८, वाशी -४ अशा एकुण १५४ कारवाया करून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ३० हजार ८०० रुपयांचा दंड करण्यात आला. 

 
Top