उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
तालुक्यातील ढोकी येथील तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अवसायक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी वित्त व वसुली अधिकारी नाईकवाडी यांच्या कामाबाबत असमाधान व्यक्त करत साखर सहसंचालक यांनी तेरणा कारखान्याच्या अवसायकपदी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विश्वास देशमुख यांची नियुक्ती केली आहे.
राजकीयदृष्ट्या महत्वाच्या कळीचा मुद्दा ठरणाऱ्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर सन २०१७ पासून अवसायकाची नेमणूक आहे. या कारखान्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज असल्याने तसेच कारखानाही बंद असल्याने अवसायक म्हणून जिल्हा बँकेचे तत्कालीन कार्यकारी संचालक विजय घोणसे यांची २ ऑगस्ट २०१७ रोजी अवसायक म्हणून साखर सहसंचालकांनी नियुक्ती केली होती. परंतु, घोणसे यांचा जिल्हा बँकेतील कार्यकाल संपल्याने कारखान्याच्या अवसायकपदाची जबाबदारी बँकेचे बिगरशेती विभागाचे मुख्याधिकारी रामदास माने यांच्याकडे देण्यात आली. नंतर अनेकांकडे धूरा दिल्यावर साखर सहसंचालकांनी शासकीय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक विश्वास देशमुख यांची कारखान्याचे नवीन अवसायक म्हनून नियुक्ती केली आहे.
 
Top