तुळजापूर/ प्रतिनिधी : -
 तुळजापूर तालुक्यात रविवारी ४४ जण कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात ऐन रक्षाबंदन सणाचा तोंडावर कोरोना मुळे  परिस्थिती गंभीर बनल्याचे  दिसुन येत आहे. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सणावर कोरोना चे संकट निर्माण झाले आहे. 
रविवारी दुपार १ वाजेपर्यंत  तब्बल ४४  रुग्ण सापडले आहेत.यात ही तुळजापूर 19, अणदूर गावात आज 18 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्हयालगत असलेल्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर, नळदुर्ग , काटी या गावांन मध्ये विक्रमी संख्येने कोरोना बाधीत रुग्ण सापडत असुन कोरोना केंद्रबिंदु बनलेल्या सोलापूर जिल्हा यास कारणीभूत असल्याची चर्चा है । 
 
Top