उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरांमधील गवळी गल्ली येथीलश्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या श्री च्या पूजाविधी साठी उस्मानाबाद मधील एलसीबी डिपारटमेंट मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक डी एम शेख राष्ट्रपती पोलीस पदक,  संतोष हंबीरे संपादक दैनिक संघर्ष, युवराज नळे सभापती नगरपरिषद यांच्या शुभास्ते संपन्न झाली. या विधिवत पूजा , आरती मंत्रो उच्चार शास्त्रोक्त पद्धतीने काशिनाथ दिवटे पुरोहित पूजारी व आचार्य यांच्या सुरेख आवाजातून, टाळ व टाळ्यांच्या गजरात संपन्न झाली.
यावेळी डी एम शेख यांना राष्ट्रपती पोलीस पदक राजकुमार दिवटे यांच्या शुभास्ते  फेटा व मंडळाच्या शेला मंडळाच्या श्री ची प्रतिमा व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  संतोष हंबीरे यांच्या नेतृत्वाखाली दैनिक संघर्ष उस्मानाबाद करांच्या मनामध्ये वाचनाची गोडी निर्माण करून  ग्रामीण भागातील व  शहराच्या घडामोडी नमूद  केलेल्या असतात दैनिक मनामध्ये वाचकांच्या घर निर्माण केला आहे  सन्मान मंडळाचे विद्या साखरे यांच्या हस्ते करण्यात आला. युवराज नळे यांचा सन्मान मंडळाचे  मूर्तिकार व कलाकार दिवटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सत्काराला उत्तर हंबीरे यांनी दिले मंडळ माझे आहे मी मंडळाचा अविभाज्य भाग आहे मला यांच्यापासून शिकण्यासारखे बरेच मिळाले आहे .मी आज संपादक म्हणून काम करत असलो तरी माझे वडील  स्वर्गीय आबा यांच्या चळवळीतून मी व मंडळाच्या कार्यातून लोकसंपर्क वाढवून आपल्या आशीर्वादाने  समाजाची सेवा करायला  लेखनातून मिळाली आहे.  कोरोणा विषयी चालू असलेली जनजागृती व कोरोना प्रतिज्ञा मंडळाने तयार करून सर्वांना सुरक्षित रहा घरी राहा हा संदेश दिला आहे .
युवराज नळे यांनी मंडळाचे कार्य जवळून पहात आलो आहे. मंडळाने विविध क्षेत्रातील  लपून बसलेल्या माणसांना प्रकाशात आणण्याचे काम मंडळाने केले आहे. आजही करीत असलेले काम पहात आलो आहे. असे मंडळ माझ्या अनुभवात आजही पाहायला मिळाले नाही असे गौरव उद्गार यांनी काढले. श्रीयुत डीएम शेख यांनी मंडळाच्या या सत्कारास मी माझा अभिमान समजतो कारण मी उस्मानाबाद मध्ये पोलीस कार्यालयात काम करू लागलो या मंडळाची शिस्त लेझीम व कुठेही वायफट अनावश्यक खर्च न करता, अत्यंत नियोजनबद्ध कार्यक्रम पत्रिकेतून 56 वर्षाचा इतिहास सर्वांच्या पर्यंत पोचतो व सेवा करीत आले आहेत. मी सामान्य कुटुंबातून आज राष्ट्रपती पोलीस पदक का पर्यंत माझे खडतर   जीवन , परिश्रम, माझा प्रामाणिकपणा माझ्या आई-वडिलांचा आशीर्वाद माझ्या सर्व मित्र व श्री गणेशाचा आशीर्वाद व जनता जनार्दन मला दिलेल्या सहकार्य त्यामुळेच उच्चपदस्थ पदक हे मिळाले आहे . हे पहिले मंडळ आहे की माझा सन्मान सर्वांच्या मध्ये करणारे आहे. आनंद व प्रोत्साहन आपल्यामुळेच जीवनामध्ये प्राप्त झाले प्रतिज्ञा कोविंड 19 ची डी एम शेख यांनी वाचन केले सर्व गणेश भक्तांनी त्यांच्या पाठीमागे म्हणून शपथ घेतली मंडळाच्या या सर्व कार्यामध्ये सर्व पदाधिकारी सदस्य यांचे यशस्वी चेक मध्ये वाटा आहे कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन भालचंद्र हुच्चे यांनी केले. मंडळाच्या समारोपावेळी गणपती बाप्पा मोरया- कोरोनाला पळू या, या जय जयकाराने करण्यात आला.
 
Top