शिराढोण / प्रतिनिधी-
येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व व रूपगिर गुरुदेवगिरी मठाच्या इनामी जमिनी वर बेकायदेशीर पद्धतीने कूळ प्रमाणपत्र देणाऱया व याबाबतचे मूळ दस्तऐवज मागणी केल्यावरून देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या कळंब व उस्मानाबाद महसूल प्रशासनाच्या विरोधात 20 ऑगस्ट रोजी गाव बंद, चूल बंद आंदोलन करण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांना लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व रूपगीर गुरुदेव गुरुदेवगिरी मठास अनुक्रमे सर्वे नंबर 55 मध्ये 9 हेक्टर व सर्वे नंबर 38 मध्ये चार हेक्टर 54 आर अशा इनामी जमिनी देवस्थानच्या असून याबाबतच्या नोंदी महसूल प्रशासनाच्या दप्तरी निजाम काळापासून आहेत. सुरुवातीच्या काळात सर्वे नंबर 55 मधील क्षेत्रावर असलेले संरक्षित कुळही महसूल प्रशासनाने प्रक्रियाअंती फेरबदल केल्याच्या नोंदी सातबारावर आहेत. सर्वे नंबर 38 वरील क्षेत्रावर कसल्याही प्रकारचे कूळ नसल्याची नोंद आहे असे असतानाही अप्पर तहसील कार्यालय धाराशिव यांनी या दोन्ही सर्वे नंबर क्षेत्रावर रघुनाथ नामदेव भिसे (रा. दाभा) यास संरक्षित कुळ भासवून सण 2000 साली प्रमाणपत्र बेकायदेशीर रित्या देण्यात आले. मुळात या दोन्ही जमिनी देवस्थानच्या इनामी असून शासनाच्या ताब्यात आहेत. कळंब तालुका महसूल विभागाकडून या जमिनी दरवर्षी एका सालासाठी परिसरातील लोकांना हरास पद्धतीने दिल्याच्या नोंदी तालुका महसूल विभागाच्या दप्तरी आहेत असे असतानाही अप्पर जिल्हा तहसीलदारांनी संबंधित व्यक्तीस नेमके कशाच्या आधारे प्रमाणपत्र दिले या बाबत परिसरात उलट-सुलट चर्चा आहेत.
या प्रकराबद्दल ग्रामस्थांना कुणकुण लागताच शिराढोण येथील ग्रामस्थांनी महसूल विभाग कळंब व जिल्हास्तरीय महसूल विभागाकडे याबाबतच्या मूळ दस्तऐवजाची रीतसर मागणी केली. परंतु या मागणीस केराची टोपली दाखवत महसूल प्रशासन टोलवाटोलवी करत उडवाउडवीची उत्तरे देत आहे. या प्रकरणात ज्या आदेशान्वये कुळ प्रमाणपत्र दिले तो आवेश कार्यान्वित करणाऱया दस्तऐवजाची संपूर्ण संचिका आज अखेर जिल्हा व तालुका महसूल प्रशासनाकडून मिळालेली नाही. यामुळे बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मंदिराची जमीन स्वत:च्या नावावर करण्याचा प्रयत्न व या संदर्भात फेरफार होण्याची प्रक्रिया शिराढोण ग्रामस्थांनी थांबविली आहे.
यासंदर्भात महसूल विभागाने मूळ कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती उपलब्ध करून न दिल्यास सदरील बोगस कुळ प्रशासनाने न थांबवल्यास 20 ऑगस्ट रोजी गाव बंद व चुलबंद करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱयांनी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.या निवेदनावर संपूर्ण ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.