उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य एकल प्राथमिक शिक्षक सेवा मंचच्या वतीने जिल्ह्यात कोरोना कक्षात कार्यरत प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे प्राथमिक शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांच्याकडे करण्यात आली.
सर्वप्रथम नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार घेतलेल्या काळे यांचे एकल प्राथमिक शिक्षक मंचच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिक्षण उपसंचालक लातूर यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षकांना कोरोना कक्षातून कार्यमुक्त करण्यात यावे असे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्याचे पवन सूर्यवंशी यांनी सांगितले. त्यानुसार तसे आदेश आपल्या जिल्हा परिषद प्रशासनाने काढावेत अशी मागणी केली.यावेळी याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे शिक्षणािधकारी काळे यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी एकल शिक्षक सेवा मंचचे राज्य कोषाध्यक्ष पवन सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा सरचिटणीस दीपक हजारे यांची उपस्थिती होती.