उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्हा व्यापारी महासंघ नगरपालिका उस्मानाबाद व जिल्हा प्रशासन उस्मानाबाद यांच्या वतीने   उस्मानाबाद शहरातील व्यापाऱ्यांच्या कोविड 19 रॅपिड टेस्ट करण्यात आल्या शहरातील व्यापाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देत स्वयंस्फुर्तीने टेस्ट करून घेतल्या.
  दिनांक  10 ऑगस्ट रोजी सर्व किराणा भुसार व सोने-चांदी व्यापारी व त्यांच्या दुकानातील कामगारांच्या जवळपास 374 टेस्ट घेण्यात आल्या . तर ११ ऑगस्ट रोजी ३५० व्यापाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या. त्यात १० ऑगस्ट ला व्यापारी वर्गाशी संबंधित केवळ सात टेस्ट पॉझिटिव्ह आल्या तर ११ ऑगस्ट ६ व्यापाऱ्यांच्या टेस्ट पॉजीटीव्ह आल्या आहेत. आठवडाभर चालणाऱ्या टेस्टमध्ये व्यापाऱ्यांचा सहभाग लक्षणीय आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे नगराध्यक्ष नंदू राजेनिंबाळकर नगरपालिका मुख्याधिकारी हरी कल्याण  येलगट्टे  यांनी वैयक्तिक रित्या भेट देऊन व्यापाऱ्यांचे मनोधैर्य वाढवले याबद्दल व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री जिल्हा सचिव लक्ष्मीकांत जाधव यांनी प्रशासनाचे नगरपालिकेचे आभार व्यक्त केले


 
Top