परंडा / प्रतिनिधी :-
दुध उत्पादक शेतक-यांच्या गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रू. अनुदान द्या. दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रू.अनुदान द्या. दुध खरेदीचा दर ३० रू.लिटर करा. यासाठी भाजपा महायुतीचा रास्ता रोको परंडा शहरात दि.१ शनिवार रोजी११ वाजता शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या वेळी आ.ठाकूर यांनी नाकर्तेआघाडी शासना विरोधात जोरदार समाचार घेतला. महाएलगार आंदोलनात रिपाईचे प्रदेश चिटणीस सजंयकुमार बनसोडे, भाजपा ता.आध्यक्ष राजकुमार पाटील,रासपाचे बप्पाजी काळे,फकीरा सुरवसे,भाजपा शहर अध्यक्ष जहीर चौधरी तसेच सर्व लोकप्रतीनिधी,भाजपा महायुतीचे पदाधिकारी,  कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top