उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यात शहरांबरोबर ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्गाचा कहर वाढत आहे. शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 120 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आजवरच्या एकुण बाधितांची संख्या 2150 वर पोहचली आहे. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. 1288 जणांवर उपचार सुरू असून 798 जणांना उपचारानंतर घरी सोडले आहे.
गेल्या काही दिवसात उस्मानाबाद, उमरगा, तुळजापूर, कळंब शहरात असलेला रुग्णवाढीचा वेग आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पसरत चालल्याचे दिसत आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या 414 स्वॅबपैकी 351 अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. यातील तब्बल 120 जण पॉझिटिव्ह आले आहेत. 225 अहवाल निगेटिव्ह आले असून 6 संदिग्ध आहेत. तर 63 अद्याप प्रलंबित आहेत.
उस्मानाबाद शहर व तालुक्यात 27, उमरगा 2५, तुळजापूर 13, कळंब 15, परंडा 31, भूम 01, वाशी 08 असे एकुण 120 रुग्ण आढळून आले आहेत. सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.