तुळजापूर/प्रतिनिधी :
शहरासह परिसरतील बीएसएनएलच्या सेवेत गेली अनेक दिवसा पासुन सातत्याने व्यत्यय येत असल्याने बीएसएनएल धारक ग्राहक ञस्त झाल्याने बीएसएनएल ने आपली सेवा सुरुळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करुन पुर्ण क्षमतेने चालवावी अशी मागणी ग्राहकांन मधुन केली जात आहे,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन करीत असताना बीएसएनएल सेवा माञ सुरुळीत नसल्याने बीएसएनएल ने उपलब्ध साधन सामुग्री वर अखंडीत सेवा देण्याची भूमिका पार पडणे गरजेचे आहे,
सध्या काँल न लागणे लागलाच तर  अचानक संभाषण चालु असताना आवाज मोठा होणे इंटरनेट बाबतीत तर प्रचंड बोंबाबोंब असल्याने शासकीय, निमशासकीय कार्यालय बँका यांना याचा सर्वाधिक ञास होत आहे कोरोना पार्श्वभूमीवर आँनलाईन शिक्षण चालु असल्याने या कालावधीत पुरेशा क्षमतेने इंटरनेट मिळत नसल्याने विध्यार्थांंना अध्ययन करताना गैर सोय होत असुन त्याने आँनलाईन शिक्षण घेणे अवघड होत असल्याने त्याचे  शैक्षणिक नुकसान होत आहे .
तरी बीएसएनएल सेवा  अखंडीत पुरेशा क्षमतेने मिळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी बीएसएनएल ग्राहक मधुन केली जात आहे

 
Top