उस्मानाबाद /प्रतिनिधी :
वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियान 2020 मध्ये अंतर्गत सन 2020 मध्ये उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ यांना 4800 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे या कार्यक्रमांतर्गत उपसासिंचन विभाग उस्मानाबाद यांना 6 414 एवढे वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते सदर वृक्षलागवडीचा शुभारंभ एक जुलै कृषी दिनानिमित्त कार्यकारी अभियंता यु. व्ही. वानखेडे यांच्या हस्ते कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
सदर वृक्ष लागवडीसाठी मौजे बुकनवाडी (ता .जि. उस्मानाबाद) येथील गायरान जमिनीची निवड करण्यात आली आहे येथे 6 414 खड्डे खोदून पूर्ण करण्यात आले आहेत व आज पर्यंत 2500 इतक्या रोपांची लागवड करण्यात आली असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग घेण्यात येत आहेकार्यक्रमासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता शैलेश कटके , उपअभियंता सी.आर. पाटील, एच.सी शेख,  शाखा अभियंता एस.एच शर्मा देवकर उपस्थित होते.

 
Top