उमरगा/प्रतिनिधी-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उमरगा पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. गेल्या आठरा दिवसांत नियम मोडणाऱ्या ३३४ जणांविरुद्ध कारवाई करुन ७० हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरगा शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन १ जुलैपासून उमरगा पोलिसांनी मास्क न घालता बाहेर पडणारे, मोटार सायकल वरुन डबलसिट जाणारे, विनाकारण बाहेर फिरणा-या लोकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. १ जुलै ते १८ जुलैपर्यंत उमरगा पोलिसांनी ३३४ जणांविरुद्ध कारवाई करुन ७० हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध दारू विक्री व जुगार खेळणाऱ्या ११ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १७३ इसमाकडून ४० हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही नागरीकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना तोंडाला मास्क लावून, सुरक्षीत अंतर ठेवून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी केले आहे.