उमरगा/प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील सोमवारी एका ठोक्यात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये शहरातील पतंगे रोड लगतचे १९ व इतर भागातील ६ जणांचा समावेश आहे. आरोग्य नगर, मलंग प्लाॅटसह मुख्य बाजारपेठेत असलेल्या शिवाजी चौकात शिरकाव केला आहे. यामध्ये तालुक्यातील मुळज येथील एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आत्तापर्यंत तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या १२१ झाली आहे.
कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपाय योजना केल्या जात आहेत. नागरीकांना वारंवार सूचनाही देण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. नागरीकांचा हलगर्जीपणा व बेफिकिरीमुळे धोका वाढताना  दिसतो आहे. कुणीही गाफील न राहता घरात थांबणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे आहे. नेहमीप्रमाणे घरात थांबणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे महत्वाचे आहे. तरच आपला परीसर, गाव व तालुका कोरोनामुक्त राहील. उमरगा शहर व तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून उपाययोजना व जनजागृती सुरु असली तरी नागरिकांनीही स्वतःहुन काळजी घेतली पाहिजे. २७ जुनपूर्वी तीन महिन्यात १७ पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले होते. २७ जूनपासुन मात्र बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. २४ दिवसात ती १२१ झाली आहे. सोमवारी तालुक्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात उमरगा शहरातील २५ नागरिकांचा समावेश आहे. यापूर्वी माजी नगराध्यक्षांचे कुटुंबातील ८ जणांना बाधा झाली होती. ते सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज शहरातील पतंगे रोडला लगत असलेल्या साने गुरुजी नगरमधील एकाच कुटुंबातील १२ जणांचा समावेश असुन याच भागातील अजय नगर येथील एकाच कुटुंबातील पाच जणासह इतर एका कुटुंबातील दोन रुग्णांचा समावेश आहे. पतंगे रोडलगत असलेल्या परीसरातच आज एका दिवशी १९ रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने या परीसराकडे लक्ष केंद्रित केले आहे. ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत तो परीसर सील करण्यात आला आहे.  उमरगा शहरातील आरोग्य नगर, बालाजी नगर, मलंग प्लाॅटसह मुख्य बाजारपेठेत असलेल्या शिवाजी चौकात शिरकाव केला आहे. त्यामुळे व्यापारी, शहरवासीयांसह ग्रामीण भागातून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. शहरातील कांही खाजगी रुग्णालयात रुग्ण आढळून आले आहेत तर सोलापूर येथे उपचारादरम्यान एका रुग्णालयातील कंपाऊंडरचा मृत्यू झाला होता. यामुळे शहरातील अनेक रुग्णांलये अघोषित बंद आहेत.

 
Top