तुळजापूर / प्रतिनिधी-
 शेतकऱ्यांच्या हक्काचा दुधदरवाढ साठी स्वाभीमानीशेतकरीसंघटना च्या वतीने मंगळवार दि2रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेस दुग्धअभिषेक करुन हा दुग्ध अभिषेक प्रसाद बैलगाडीतुन मोफत वाटप करुन राजेशहाजीमहाध्दार समोर  प्रतिकात्मक दुध कँन्ड ओतुन आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सोशल डिस्टंन्स पाळुन करण्यात आले. दरम्यान तहसिलदार यांना स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांचा नेतृत्वाखाली धनाजी पेंदे, राजु हाके गुरुदास भोजणे, जमदाडे यांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले .
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,  दुध पावडर आयात निर्णय रद्द करा,  दुधाचा बफर स्टाँक करावा, दुधजन्य पदार्थ्यावरील जीएसटी रद्द करावी, शेतकऱ्यांचा खात्यावर प्रतिलीटर पाच रुपये अनुदान जमा करावे या मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही यावेळी दिला. यावेळी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांनी केले आहे.
 
Top