
शहरी भागासह ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढू लागली परिणामी विजेचा अपुरा होत असलेल्या पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात लोडसिडीगच्या प्रमाणात वाढ होत असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागांतील नागरीकाचे सत्ततच्या लोडसिडीगमुळे रात्रीच्या काळोखामुळे होत असलेले हाल रोखण्यासाठी प्रशासनाकडून तेर ता. उमानाबाद येथे विविध योजने द्वारे लाखो रुपये खर्च करुन 124 सौरदिवे बसविण्यात आले आहेत .
या मध्ये कृषी विभागाच्या वतीने 7, दलित वस्ती सुधार योजनेतून 32, पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेतून 27, तीर्थ क्षेत्र विकास निधीतून 6, व तेराव्या वित्त अयोगातून 52, सौरदिवे बसविण्यात आले आहेत परंतु या सौरदिव्याच्या देखभाल दूरुस्थीकडे प्रशासनासनाकडून साफ दुर्लश करण्यात येत असल्यामुळे गावातील अनेक भागातील सौरदिव्याची पुरती वाट लागली आहे तर अनेक सौरदिव्यावरील बॅट-यासह सौरपत्रे दिसून येत नाहीत तर अनेक सौरदिवे झाडी झुडपाच्या विळख्यात सापडले आहेत तसेच अनेक भागातील सौरदिवे देखभाल दूरस्थी अभावी शोभेच्या बाबुंसारखे उभे असल्याने सर्वत्र काळोख पसरत आहे .त्यामुळे सौरदिवे असुन अडचण नसुनही खोळबा होत असल्याने नागरीकात तीव्र संताप होत आहे .त्यामुळे देखभाल दुरुस्ती होत नसेल तर उगाच या योजनेवर लाखोंचा चुराडा कशासाठी असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आतातरी प्रशासनाने लक्ष देऊन सौरदिवे चालु करण्याची मागणी नागरीकातून होत आहे.