लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील अत्यंत गरजू कुटुबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या वतीने पंधरा दिवस पुरेल ऐवढे किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उस्मानाबाद यांच्या वतिने किराणा किट वाटप करण्यात आले.
त्यात पंधरा दिवस पुरेल इतका गहू, तांदूळ, दाळ, साखर, तेल मिठ, मिरची, हळद, कांदे साबन, मास्क व आयुष्यमान मंत्रालयाने सुचवलेल्या काड्याचे वितरण केले. या प्रसंगी जनकल्याण समिती उस्मानाबाद येथील पुर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, जिल्हा कार्यकर्ते शाहजी जाधव, तालुका कार्यवाह दत्तात्रय पोतदार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रोहित लोळगेे, भारतीय जनता पार्टीचे भोजापा कारभारी, युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, युवा मोर्चाचेे तालुका सरचिटणीस रवीराज कारभारी, सुधीर कोरे, श्रीशैल्यल्य बिराजदार, किशोर होनाजे, वैजनाथ सोळसे, नितीन दंंडगुले, विश्वनाथ नागेश, नितीन निंबाळे, सचिन निगशेट्टी, गणेश तांबडे, इंद्रजीत सूभेदार, सागर कलशेट्टी, सिताराम बंडगर आदीं, उपस्थिती होते.
 
Top