वाशी  / प्रतिनिधी-
पोषनाची आणि आरोग्याची स्थिति सुधारण्यासाठी व आहारमध्ये विशमुक्त , ताज्या आणि आणि पोषकतत्व युक्त भाजी पाला नियमित घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ंनोत्ति अभियानाच्या वतीने माझे पोषण परसबाग मोहीम दि २५ जुने  ते १५ जुलै २०२० पासून सुरू करण्यात आली आहे . वाशी पंचायत समिति अंतर्गत महिला स्वयंसहायता समूह च्या माध्यंतून ही मोहीम राबवण्यात येत आहे.या उपक्रमास महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
उमेद अभियाना अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहातील सदयांच्या कुटुंबाचे आरोग्याची स्थिति सुद्रुड राहावी या साठी सदस्यस वैयक्तिक स्तरावर  पोषण परसबागेच्या विकसणाचे महत्वाकंक्षी  कार्य उमेद अभियान अंतर्गत सुरू आहे.२०२०-२०२१मध्ये सुद्धा समूह स्तरावर वैयक्तिक व सामूहिक पोषण बागेच्या विकसणाचे कार्य सुरू असून या करिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्ंनती अभियाना पंचायत समीती वाशी च्या वतीने माझी पोषण परसबाग मोहीम तालुक्यातील सर्व गावातील सीआरपी, सी टी सी, उपजीविका सखी ,बँकसखी, लघु उद्योग सल्लागार,ग्राम संघ पदाधिकारी यांच्या कडून  राबवण्यात येत आहे. या करिता तालुका स्तरावरून  मार्गदर्शन करतण्यात येत आहे.
 
Top