उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोरोनामुळे ५ एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा तसेच आयोगाच्या अन्य परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकललेल्या होत्या. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई व इतर शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे परीक्षार्थी आपापल्या गावी गेले आहेत. रेड झोन असलेल्या पुणे येथे ४ हजार परीक्षार्थींनी परीक्षा केंद्राची निवड केली आहे. त
्यापैकी ९० टक्के परीक्षार्थी हे दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत व सध्या ते आपापल्या जिल्ह्यात आहेत. नवीन जाहीर वेळापत्रकाप्रमाणे परीक्षार्थी परीक्षेसाठी शहरी भागात मोठ्या प्रमाणात येणार असून परीक्षेनंतर ते मुळ जिल्ह्याच्या ठिकाणी जातील. त्यामुळे संक्रमणवाढीचा धोका संभवतो. या सर्व गोष्टींचा विचार आयोगाने करून यूपीएससीने जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही परीक्षार्थिंना आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र बदलून द्यावे व यासाठी आयोगाने आपले संकेतस्थळ ७ दिवसांसाठी खुले करून उमेदवारांना आपले परीक्षा केंद्र बदलण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.

 
Top