उस्मानाबाद /प्रतिनिधी-
ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली इंग्रजी शाळेत वह्या,पुस्तके,सक्ती करून चढ्या दराने विक्री करत असलेल्या शाळेवर व मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करावे करावी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा कोरोना व्हायरस मुळे बंद आहेत तरी देखील शिक्षण संस्थांची लुटमारी काही थांबेना झाली आहे लाॅकडाऊन मुळे पालक वर्ग आर्थीक संकटात सापडला आहे त्यांच्या हाताला कामे नाहीत नौकरी करतात त्यांच्या पगारी कापल्या जात आहेत, दुकाने बंद आहेत,पालकांचे खाण्याचे वांदे झाले आहेत आणी त्यात शाळा, फिस साठी पैसैची वारंवार मागणी करत असून,त्यात ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लाखो रूपयांची लुट केली जात आहे तसेच ४०%पालकानकडे स्मार्ट फोन नाहीत तरी देखील शिक्षण संस्था ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली फिस घेत आहेत पैसैची मागणी करत आहेत तरी राज्य सरकारने ऑनलाईन शिक्षण बंद करावे,राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंञी ,मा.बच्चूभाऊ कडू यांनी दिनांक १२-७-२०२०रोजी आकोला येथे खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वह्या पुस्तके गणवेश सक्ती केली तर शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ शाळेवर गुन्हे दाखल करावे असे निर्देश दिले आहे तरी देखिल शिक्षण विभाग या कडे दुर्लक्ष करत आहेत,शिक्षण विभागाने उस्मानाबाद शहरातील व जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शालेय साहित्य विक्री करणार्या शाळेवर गुन्हे दाखल करावे अन्यथा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षण विभागानेच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी
 
Top