तुळजापूर/प्रतिनिधी-
तालुक्यातील काटगाव  व खडकी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याच्या अनुषंगाने  आ राणाजगजितसिंहपाटील यांनी काटगाव येथे भेट देवुन  संबंधित अधिकारी व ग्रामस्थांशी  चर्चा करुन घाबरुन जावू नका प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
तसेच जवळच असणाऱ्या खडकी तांडा येथील एका डॉक्टरांचा काटगाव येथे खाजगी दवाखाना आहे. सदरील डॉक्टर आजारी झाल्याने त्यांची कोरोना टेस्ट घेतली असता ते पॉझिटिव्ह निघाले आहेत. उपचाराच्या निमित्ताने गाव व परिसरातील अनेकांशी त्यांचा संपर्क झालेला आहे.कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या संबंधित डॉक्टरांच्या संपर्कात कोणकोण आले याची माहिती घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यासंबंधी यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी तहसीलदार तांदळे साहेब, गटविकास अधिकारी श्री.प्रशांतसिंह मरोड, तालुका आरोग्य अधिकारी श्री.पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.राऊत, श्री.पिंटू मुळे, उपसभापती श्री.अण्णा सरडे, वसंतराव वडगावे, सरपंच श्री.सोमनाथ कांबळे, उपसरपंच श्री.अशोक माळी, श्री.बाबा बेटकर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
 
Top