उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 येथील म्हाडा कॉलनी भागात व महात्मा गांधी नगर या भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधित भागास खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास घाडगे-पाटील, नगरीचे नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी भागातील नागरिकांशी चर्चा केली. आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे,असे आवाहन केले.
यावेळी डिसीसी बँकेचे संचालक संजय देशमुख,शिवसेना गटनेते सोमनाथ गुरव,रवी कोरे,केदार,साळुंके,पंकज पाटील,चेतन वाटवडे,मनोज पडवळ,डेप्युटी मुख्यधिकारी श्री.पवार, नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, आनंद नगर पोलिस स्टेशचे पोलिस निरिक्षक श्री. सतिष चव्हाण, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते. 
 
Top