लोहारा/ प्रतिनिधी
लोहारा शहरातील सलुन व्यावसायीकांना दुकाने उघडनण्यास परवाणगी देण्यात आली आहे. शहरातील सर्व सलून व्यवसायिकांना कोविड - १९ या रोगापासुन बचाव होण्यासाठी सामाजिक भावना जपत युवासेना लोहारा  तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यावतीने फेशशिल्ड व सँनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरपरिषदचे गटनेते अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, युवासेनेचे दत्ताभाउ मोरे, किरण पाटिल,  संत सेना नाभीक मंडळाचे उपाध्यक्ष बालाजी माने, संतोष फरीदाबादकर, अमोल फरिदाबादकर, कल्याण ढगे, यांच्यासह शहरातील सलुन व्यावसायीक उपस्थित होते.
 
Top