उस्मानाबाद/प्रतिनिधी
कोविड रोगाच्या संक्रमणास आळा बसावा, यासाठी शासन तसेच जिल्हा प्रशासन यांनी दुकाने, हॉटेल इत्यादी आस्थापना यांसाठी विविध मनाई आदेश जारी केले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करुन करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी कळंब शहरात करण्यात आली.
यामध्ये कळंब शहरात आवेज अब्दुल गफार यांनी ‘जनैदी कलेक्शन’, शहाजी बब्रुवान मगर यांनी ‘सत्यम इलेक्ट्रीकल्स’, सुमित शशांक मोदी यांनी ‘डेनिम कलेक्शन’, दिनेश बबनराव आष्टेकर यांनी ‘आष्टेकर स्टिल सेंटर’, शम्मु हमीद पिंजारी यांनी ‘समीर गादीघर’, मुज्जमिर रफिक शेख यांनी ‘लकी क्लॉथ सेंटर सुरू ठेवले. संसर्गाच्या अनुशंगाने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नाही. तसेच स्वत: सह कामगारांच्या नाका- तोंडास मास्क न लावता, ग्राहकांत सुरक्षित अंतर न ठेवता दुकाने व्यवसायासाठी चालू ठेवली. महादेव भीमराव बोरगे यांनी तुळजाभवानी हॉटेल सुरू ठेवले. व्यवसाय सुरू ठेवून काेरोना संसर्गाच्या अनुशंगाने कोणतीही खबरदारी न बाळगता हॉटेलमध्ये १५ ग्राहकांना जेवण दिले. यामुळे कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

 
Top