तुळजापूर/प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तिर्थक्षेञ तुळजापूरात कुणीही उपाशी राहत नाही आजवरची असलेली प्रतिमा कोरोना मुळे करण्यात आलेल्या लाँकडाऊन मुळे बदलली गेली आहे.
तिर्थक्षेञ तुळजापूरात असणाऱ्या निराधार, अंध,  अपंग, वयोवृध्द भिकारी वर्गास आज उपासमारीस सामोरे जावे लागत आहे.श्री तुळजाभवानी मंदीरात भाविकांना कोरोनामुळे प्रवेश बंद असल्याने येथे भाविक फिरकनासा झाला आहे. त्यामुळे भिक देणारेच  नसल्यामुळे भिक कोण देणार असा प्रश्न असल्याने भिकारी इतरञ गेले आहेत.
तिर्थक्षेञी श्रीतुळजाभवानी मातेची परडी पीठ, मीठ, अन्नधान्याने भरण्याची प्रथापरंपरा आहे. परडी भरल्या नंतर त्यात दक्षणा रुपी पैसा देविच्या माळपरडीत टाकुन भाविक या माळपरडीचे दर्शन घेवुन माळपरडी भरण्याचा धार्मिक विधी पुर्णा करतो त्यामुळे भाविकांनकडून मिळणारा जोगवा व  दानरुपी  रुपी मिळणारे पीठमीठ ,अन्नधान्य, पैसा बंद झाला आहे,याचा परिणाम येथे परडी घेवुन बसणा-या शेकडो अंध, अपंग वयोवृध्द भिका-यांना बसला आहे.सध्या बोटावर मोजण्या इतके  भिकारी मंदीरा समोर दिसतात एकादा दुसरा भाविक असला कि त्याचा कडून मिळेल ते भिक मागुन कसेबसे जगत आहे.
काही भिकारी इतरञ गेले आहे, त्यामुळे श्रीतुळजाभवानी मंदीर परिसर भिका-यांविना सुनासन गेली तीन महिन्या पासुन पडला आहे. सर्व भिकेवर जगणारे व भिक मागणारे मंदीर भाविकांनसाठी खुले होण्याची वाट बघत आहे,

पुजा-यांची भिका-या प्रती माणुसकी !
तिर्थक्षेञी प्रामुख्याने वृध्द, अंध,अपंग माणसिक रुग्ण निराधार मंडळी अशा भिका-यांची संख्या मोठी आहे.  यातील काही भिकारी आपल्या गावाकडे नातलगाकडे गेले परंतु माणसिक रुग्ण असलेले वेडसर तसेच ज्यांना कुणीही नाही अशा निराधार भिका-यांना स्थानिक काही पुजारी वर्ग घरात बोलवुन दोनवेळेचे जेवण देत असल्याने  मंदीर बंद असले तरी भिकारी पुजा-यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे लाँकडाऊन मध्ये जगत आहेत

बनावट भिकारी गायब !
तिर्थक्षेञी भिकेचा रुपाने मोठी अर्थप्राप्ती होत असल्याने येथे व्यवसायीक भिकारी गर्दी दिवशी परजिल्हयातुन खास करुन  सोलापूर येथुन  सकाळी येवुन भिक मागुन राञीसात वाजता  गावी जात होते असे आठ ते दहा स्ञीपुरुष महिला भिकारी दिसेनासे झाले आहेत.तर काहींनी आपले मुले येथे भिक मागण्यासाठी पाठवत होते, अशा मुलांची संख्या जवळपास वीस पर्यत गेली होती असे डुप्लीकेट भिकारी सध्या गायब झाले आहेत . 
 
Top