उमरगा/प्रतिनिधी-
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘राजगृहा’वर मंगळवारी दि ७ रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून सीसीटीव्ही कॅमऱ्यांची, घराच्या काचांवरही दगडफेक केली, घरातील कुंड्यांचे नुकसान केले आहे.हा हल्ला आमच्या अस्मितेवर केलेला हल्ला आहे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन करावे या मागणीचे निवेदन उमरगा येथीलशिव,बसव,फुले,शाहू,आंबेडकर विचार मचंच्या वतीने बुधावारी दि ८ रोजी देण्यात आले.तहसीलदार याच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे.निवेदनात असे म्हटले आहे की राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयाना हे प्रेरणा स्थान आहे. 
श्रद्धेचे ठिकाण आहे.राजगृहावर झालेला हल्ला हा आंबेडकरी अस्मितेवर हल्ला झाला आहे याचे बोलविता धनी कोण आहे हे कृत्य ज्यांनी केले त्यानां तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आंबेडकर अनुयायांनी केली आहे.या निवेदनावर भारीपचे रामभाऊ गायकवाड, भाजपाचे कैलास शिंदे,कॉग्रेसचे दिलीप भालेराव,रिपाइंचे सुभाष सोनकांबळे, डॉ.चंद्रशेखर गायकवाड याच्या सह अडँ मल्हारी बनसोडे,हिराजी पांढरे,गुणरत्न भालेराव, बाबूंराव गायकवाड, उमाजी गायकवाड, भगवान गायकवाड, दत्ता रोंगे, सचिन माने,नागनाथ कांबळे, तिप्पा बनसोडे, राजेंद्र उबाळे,राजाभाऊ शिंदे, बुआ गावंडे,राघवेंद्र गावडे आदींच्या सह्या आहेत.
 
Top