तुळजापूर/ प्रतिनिधी
 तहसील कार्यालयातील लिपिक कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने तातडीने तहसील कार्यालय रिकामे करण्यात आले. हाय रिस्क काॅन्टॅक्टमधील ८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात अाले असून, तहसीलदारांसह उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना होम क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी शहरात आणखी ५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
नेहमी गजबजलेल्या तहसिल कार्यालयातील लिपिकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आढळून आल्याचे समजताच सकाळी तातडीने तहसील कार्यालय रिकामे करण्यात आले. ५२ वर्षीय लिपिक उस्मानाबाद येथील रहिवासी असून दररोज ये जा करीत होता. गेल्या काही दिवसांपासून आजारी होता.
तहसील कार्यालयातील कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आल्याने तहसिल कार्यालय सील करण्यात आले आहे. आगामी २ दिवस तहसिल कार्यालय बंद राहणार अाहे.

 
Top