परंडा  / प्रतिनिधी-
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. बोर्ड परीक्षा मध्ये ग्लोबल विद्यालय परंडा - सोनारी रोड, खानापूरचा 100% निकाल लागला आहे.
यामध्ये कु.यश कैलास मोरे याने 95.40 % गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर कु.प्रवीण दत्तात्रय नाईकनवरेयाने 86.80% गुण मिळवून शाळेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला तर कु.प्रेम गोरख मोरजकर याने 83.80% गुण मिळवून शाळेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गोरख मोरजकर सर व सचिवा सौ.आशा मोरजकर मॅडम तसेच पालक सौ.मोरे मॅडम, दत्तात्रय नाईकनवरे, शिक्षक खैरे सर, शेळके सर, ठवरे सर, ठाकुर सर व भगत सर व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 
Top