उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 लोहारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी वैजिनाथ मोहिते हे दि.२३ रोजी सकाळी ११.१५ वाजता कमलापूर येथे कोविड-१९ च्या अनुषंंगाने कर्तव्यावर होते. यावेळी अमर विश्वनाथ कांबळे (रा. अशीव, ता. औसा) हा नाका- तोंडास मास्क न लावता फिरताना आढळल्याने मोहिते यांनी त्यास हटकले. यावर त्याने चिडुन मोहिते यांना शिवीगाळ करुन, धक्काबुक्की केली. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 
Top