तुळजापूर / प्रतिनिधी-
 तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात नागपंचमी सण पारंपारिक पध्दतीने कोरोनाचा सावटा खाली शनिवार दि. 25 रोजी सा्धेपणाने साजरा करण्यात आला. पहाटे श्री तुळजाभवानी मंदीरात देविचे मुख्य मंहत वाकोजीबुवा यांच्या हस्ते होमकुंडासमोर विधीवत पितळेच्या  नागदेवतेचे  पुजन करुन आरती करण्यात आली.
नागपंचमी निमित्ताने श्रीतुळजाभवानी मातेच्या कपाळी गंधावर  नागदेवतेची चिञ साकारले होते.  तसेच तालुक्यातील तिर्थ सांगवीमार्डी येथील नागदेवतेच्या  मंदीरांनमध्ये पुजारीवृदांनी नागदेवतेचे पुजन केले. कोरोना पार्श्वभूमीवर मंदीरात गर्दी करु नये असा आदेश असल्याने हे मंदीरे भाविकांन विना सुनासन होते. ग्रामीण भागात महिलांनी नागदेवतेच्या दगडी मुर्तीचे पुजन तर काही गावांन मध्ये वारुळांचे पुजन करुन नागपंचमी सण साधेपणाने साजरी केली. यंदा कोरोना मुळे कुठलीही माहेरवाशीन माहेरी आली नाही, झोके बांधले गेले नव्हते तसेच महिलांचा  फेर धरण्याचा कार्यक्रम कोरोना मुळे झाला नाही.

 
Top