औरंगाबाद, / प्रतिनिधी
 जगात चालू असणारी महामारी व त्याचा देशाच्या आर्थिक परिस्थिती वरती होणारा परिणाम आपण सर्व जन जवळून पहात आहोत. ज्या कुटुंबांनी आर्थिक व्यवस्थापन केले होते त्यांना या मोठ्या संकटाचा सामना करताना आर्थिक आडचणी कमी येत आहेत. परंतु कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन ज्यांनी केले नाही अशा परिवाराला किंवा व्यक्तींना परिस्थिती समोर जाताना अनेक आडचणी येत आहेत. कुटुंबा मध्ये आर्थिक घडी बसावी व पेंडेमिक सारख्या परिस्थितीला समोरजाण्या साठी “कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचे” मॉडेल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अरुणराव अमृतराव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथील व्यवस्थापन संकुलाचे डॉ. हनुमंत श्रीराम पाटील यांनी तयार केले आहे. सदर मॉडेल हे कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. सदर मॉडेल  पेटेंट साठी मुंबई येथील भारतीय पेटेंट कार्यालयात सादर केले होते. हे मॉडेल भारतीय पेटेंट च्या जर्नल मध्ये दि १७ जुलै रोजी प्रकाशित झाले आहे. सिस्टम अंड प्रोसेस फॉर फायनंसियल मेनेजमेंट विथ कस्टमर सेल्फ सर्विस नावाने सदर मॉडेल प्रकाशित झाले आहे. या मॉडेल विकसित करताना  व्यवस्थापन शास्त्र विभाग, उप-परिसर उस्मानाबाद व व्यवस्थापन शास्त्र संकुल, उपकेंद्र लातूर यांची मोठी मदत झाली आहे. या उपलब्धीबद्दल दोन्ही प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले,  प्रकुलगुरुड  प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉ डी के गायकवाड यांच्यासह सर्व सहकारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top