वाशी / प्रतिनिधी-
सध्या जगभरात कोरोना या जागतिक महामारी मुळे सर्व जगाचे अर्थव्यवस्था बंद पडलेली असून  यामुळेच देशाची सर्वच चलन वलन व्यवस्था बंद पडलेली आहे. अशा वेळी जिल्ह्यातील काही खाजगी फायनान्सचे कर्मचारी कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये पूर्व तपासणी व कोणाचीही पूर्व परवानगी न घेता अवेळी बचत गटाच्या माध्यमातून वसुली करण्यासाठी डायरेक्ट घरी जात आहेत. यावेळी कोरोना संक्रमणाचा धोकाही वाढत आहे .व महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे .आर.बी.आय बँकेच्या कर्ज वसुली न कारणे बाबत सूचना असतानाही सदरील खाजगी फायनान्स सक्तीची वसुली करत करत आहे .सध्या कोरोन संक्रमणाचा काळ असल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम नसतानाही सदरचे खाजगी फायनान्स वाले त्यांच्या कर्मचाऱ्या मार्फत सक्तीची वसुली करून ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास देत .सदरील फायनान्स कंपनीच्या सक्तीच्या वसुली विरोधात योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईल ने सदरील फायनान्स कंपनीची वसुली थांबविण्यात येईल व होणाऱ्या पुढील घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन नायब तहसीलदार स्नेहलता पाटील यांना देण्यात आले . यावेळी निवेदनावर सुरज बाळासाहेब सुकाळे,अनिकेत शिंदे ,अमोल जानराव,किरण सावंत,अमोल सुकाळे,विजय जानराव,राहुल गायकवाड,प्रविण पालखे,शिद्दोधन सुकाळे,बाळू गायकवाड,ऋतिक आरकडे यांच्या सह्या आहेत.

 
Top