उस्मानाबाद (प्रतिनिधी)
 हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,वसंतराव नाईक  यांची 107 वी जयंती उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरी करण्यात आली.
     जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहमध्ये जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे,कृषी विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमणशेटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव,जिल्हा समाज कल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 कृषी दिनानिमित्त माहिती पत्रिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
     जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील जिल्हा कृषी अधिकारी एस.एस.पठाडे, वी.एस.निरडे, जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी तंत्र अधिकारी चंद्रकांत मंगरुळे, सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी बाबा सावंत यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
 
Top