उस्मानाबाद,/ प्रतिनिधी-
उस्मानाबाद नगर परिषदेतील तीन कर्मचारी 30 जून 2020 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करुन निरोप देण्यात आला.
नगर परिषदेचे वरीष्ठ लिपिक सुनील महाजन, वाहन चालक विठ्ठल गोरे, शिपाई बापू राठोडे हे कर्मचारी प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. यानिमित्ताने मंगळवारी (दि.30) नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने तिघांचा शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करुन पुढील आयुष्यासाठी सदिच्छा दिल्या. यावेळी कर्मचार्‍यांनी सेवा काळात केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. सत्कार कार्यक्रमास मुख्याधिकारी श्री. पवार, नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक तावडे, कार्यालयीन अधीक्षक संजय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण यादव यांच्यासह नगर परिषद कर्मचारी उपस्थित होते.
 
Top