लोहारा/ प्रतिनिधी
 उपजिल्हाधिकारी तथा कोविड नियंत्रण संपर्क अधिकारी प्रताप काळे यांनी दिनांक 8 जुलै रोजी लोहारा येथील सर्व यंत्रणा अधिकारी व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांची आढावा बैठक घेऊन विविध सूचना दिल्या व मार्गदर्शन केले. या वेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले उपस्थित होते. कोविड संपर्क अधिकारी प्रताप काळे यांनी या वेळी कोरोना केयर सेन्टर व ग्रामीण रुग्णालय येथील तयारीची पाहणी केली व उपयुक्त सूचना केल्या.
यावेळी त्यांनी मास्क न लावणारे लोक व गर्दी जमवणारे दुकानदार यांचेवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांनी रुग्णाची माहिती कळविणे दवाखान्यात आवश्यक काळजी घेणे तसेच स्वतः ची काळजी घेणेबाबत सूचना दिल्या. पोलीस विभागाने बिट कर्मचारी यांची गस्त वाढवावी व अनावश्यक फिरणारे व पान टपरी वर कारवाही करावी. या बैठकीस तहसीलदार विजय अवधाने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.यू.सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी  काठारे, नगरपालिका मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलीस निरीक्षक अशोक चौरे  नायब तहसीलदार रपजीत शिराळकर, यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.

 
Top