तुळजापुर / प्रतिनिधी
आगामी काही महिने हे कोरोना  वाढण्याची शक्यता असल्याने ऐकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी पथके तयार करुन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर  दंडात्मक किंवा फौजदारी  कारवाई करुन सोशल डिस्टंन्स पाळण्यासाठी जे-जे शक्य आहे ते -ते करुन कोरोना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचा सक्त सुचना उपविभागीय अधिकारी  रामेश्वर रोडगे यांनी कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर येथील तहसील कार्यालयात  बुधवार रोजी शहरातील शासकीय डाँक्टर, पोलीस, खाजगी डाँक्टर, पंचायत समिती अधिकारी  यांची घेतलेल्या  विशेष बैठक दिल्या
या वेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी सदरील बैठकीत शहरातील पोलीस,प्रशासकीय यंञेनेला संसर्गजन्य कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शहरात सर्व प्रशासकीय यंञनेच्या वतीने कडक उपाययोजना करण्यात याव्यात सोलापूर जिल्हातुन पासेस असल्याशिवाय आपल्या सोडू नका  सरहद्दीवरुन एकही व्यक्ती विनापास येऊ देऊ नये पोलीस विभागाच्या वतीने कडक  बंदोबस्त लावण्यात यावा अशा सुचना देऊन वेळ पडल्यास  शहरातील खाजगी दवाखान्याचे बेड घेणार असल्याचे यावेळी सांगितले. शहरातील बँकेच्या ठिकाणी शोसल डिसलेन्स पाळला जात नसल्याने येथे बँरेकेटींग लावा व गाव लेवलवर बँकिंग सेवा द्या अशा सुचना बँक अधिकारी वर्गास दिल्या : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी. पोलिसांच्या पथकाने खानापूर, ढेकरी व तामलवाडी चेक पोस्टवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात यावा. शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये दर शनिवारी जनता कर्फ्यू चे काटेकोरपणे पालन करावे. यामध्येही नियमांचे उल्लंघन करणा-‍याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी. खाजगी डॉक्टर यांनी कमीत कमी 300 व्हेंटलेटर सह बेडची व्यवस्था करणेबाबत कार्यवाही करावी,असे यावेळी सांगितले
या बैठकीस तहसिलदार तांदळे गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, पो.नि हर्षवर्धन गवळी, तामलवाडी पोलिस स्टेशनचे पो. नि. मिरकर  तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. सतिष पवार,उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जाधव सह खाजगी रुग्णालयाचे डाँक्टर बँक अधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचारी उपस्थित होते. 
 
Top