उस्मानाबाद / प्रतिनिधी-
परंडा तालुक्यातील आनाळा येथे व्यापाऱ्यांना गर्दी करू नका, अतिक्रमण केलेले प्लाटींग बाजूला घ्या, असे  सागण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंभी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक पालवे यांना मारहाण करण्याचा प्रकार दि. ९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हयात कोरोना रूग्ण वाढत असल्यामुळे सर्वत्र दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सहाय्यक पोलिस निरिक्षक पालवे, आनाळा चौकातुन जात असताना चौकात गाडयाची व लोकांची गर्दी झालेली दिसून आली. त्याच प्रमाणे एका व्यापाऱ्याने रस्त्यावर पाईपाला  प्लॉस्टींग बांधून विक्रीसाठी ठेवले होते. पालवे यांनी सदर व्यापाऱ्यास रस्त्यावर गर्दी होत आहे ते दुकानामध्ये ठेवा, असे सांगण्याचा प्रयत्न केल्यानंतर सदर व्यापाऱ्याने गेल्या दोन महिन्यापासून आम्ही हेच ऐकताव, असे म्हणून पालवे यांना ढकलले यामध्ये पालवे यांचा पाय आडकल्यामुळे ते खाली पडले. त्यानंतर सदर व्यापाऱ्यास पोलिस ठाण्यात आणले.  त्यानंतर सपोनि पालवे बाहेर जात असताना त्याच्या गाडीसमोर दोघा तिघांनी गाडी आडवी लावून पालवे यांना वडीलास का मारहाण केली, असा जाब विचारत सदर व्यक्तीने मारहाण केली. सदर प्रकार घडताच पालवे यांनी वरिष्ठांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पोलिस उपअधीक्षक डा. विशाल खांबे हे घटनास्थली दाखल झाले. त्यानंतर संबंधीतावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याचे सांगण्यात आले.अधिक माहिती घेण्यासाठी पोलिस अधिक्षक यांना संपर्क साधण्यात आला असता त्यांचा सपंर्क होवू शकला नाही. 
 
Top