उस्मानाबाद  / प्रतिनिधी-
 वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या संत तुकारामांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संदेशातून शाळा परिसरात वृक्षसंवर्धनाने वनराई करण्याचा एक उपक्रम जि प के प्रा शाळा होर्टी येथे  विध्यार्थां  ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून गतवर्षीपासून शाळेने अंमलात आणला जात  आहे .
सध्या शाळेत 250 जिवंत झाडे आहेत. एक मूल एक झाड हा उपक्रम सुरू आहे .परंतु कोरोना प्रतिबंधामध्ये शाळा बंद अभ्यास सुरू आहे, तरीही या वर्षी आणखी अडीचशे झाडे लावण्याचा संकल्प पूर्ण होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पावसाची रिमझिम सुरू होताच जि प सदस्य प्रकाशजी चव्हाण, पं.स सदस्या शीलाताई मधुकर गायकवाड ,होर्टीचे सरपंच सौ. सुवर्णाताई सिनाप्पा गुंजीटे , ग्रा. पं.सदस्य सिनाप्पा गुंजीटे,जळकोट विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधर सर्जे, केंद्रप्रमुख अरुण अंगुले, ग्रामसेवक विनेश कांबळे, मा. सरपंच ज्ञानेश्वर भोसले, शा.व्य. समितीचे अध्यक्ष संतोष मोरे ,धुळाप्पा वाघमारे, मधुकर गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी बाबुराव चव्हाण, बालाजी माळी, हरिभाऊ कळबंडे, मारूती कोरे, विजयकुमार कदम, बसवराज माशाळकर,नितीन रामणबैनवाड, विजय चव्हाण, व्यंकटराव कोळी,ज्ञानू भोसले,माणिक गजेले,खंडू भोसले,ज्ञानेश्वर पांचाळ, मनोहर सगर आदीं उपस्थितीत होते .शेवटी बसवराज माशाळकर यांनी सर्वांचेआभार मानले.
 
Top