उमरगा/ प्रतिनिधी-
उमरगा -लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले याचा गुरुवारी दि ३० रोजी कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्याना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याने पुढील उपचारासाठी मुबंई येथे गुरुवारी घेऊन जाणार असल्याचे त्याच्या निकट वर्तीयांनी सांगितले आमदार चौगुले याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हतबल झाले आहे तर शहरातील नागरिकांतुन चिंता व्यक्त केली जात आहे.
आमदार चौगुले गेली चार महिन्यापासून तालुक्यातील विविध गावात दौरे करून कोरोनाच्या रुग्णाला सावरण्यासाठी काम करीत होते.जिल्ह्यातील पहिली मिटींग त्यानीं उमरगा येथे घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यानीं तालुक्यातील जनतेला या रोगाची बाधा होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरून काम केले आहे.प्रारंभीच्या काळात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यां मार्फत प्रत्येक घरा पर्यत धान्य किट पोचवून जनतेची उपासमार होणार नाही ही काळजी त्यानीं घेतली.मागील काही दिवसांपासून तालुक्यात झालेला कोरोनाचा कहर आणि वाढत असलेली रुग्ण संख्या या मुळे ते सतत प्रशासना सोबत रस्त्यावर उतरून काम करीत असताना त्याना कोरोनाची बाधा झाली आहे.