तुळजापूर/ प्रतिनिधी-
तालुक्यातील सिंदफळ शिवारात लोखंडी पोल मध्ये  विद्युत प्रवाह उतरल्याने चरण्यासाठी गेलेल्या बैलाला करंट लागल्याने यात तो मरण पावल्याची घटना मंगळवार दि.28 रोजी सकाळी सात वाजता घडली .
याबाबतीत अधिक माहीती अशी की,  सिंदफळ ता तुळजापूर येथील शेतकरी रवि कापसे यांचे सर्व नं250मधील शेतात मंगळवारी सकाळी सात वाजता बैल चरावयास गेला लोंखडी पोल मध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने करंट लागुन मयत पावला. रवि कापसे यांनी सात महिन्या पुर्वी हा बैल ८० हजाराला आणला होता .तो मरण पावल्याने आधीच कोरोना दुबार पेरणी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. सदरील घटनेची माहीती तहसिलदार पोलिस निरक्षक महावितरण कंपनी यांना अर्ज देवुन दिली आहे

 
Top