उमरगा/ प्रतिनिधी-
उमरगा तालुक्यातील कोळसुर कल्याणी येथील दयानंद नगर तांड्यातील तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू.यात दोन मुली आणि एका मुलाचा  समावेश आहे. विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या मृत्यू झाला ही घटना गुरुवारी दि ३० रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
या बाबतीत मिळालेली माहिती अशी की,कोळसुर कल्याणी दयानंद नगर तांड्या जवळ डोंगराच्या पायथ्याला रोड च्या कामासाठी भराव घेऊन जाण्यासाठी मोठी  विहिर  जेसीबीच्या सहायाने खोदण्यात आली आहे.यात बुधावारी आलेल्या पावसाचे पाणी साचले आहे. या विहिरीत शेळ्या चरण्यासाठी गेलेल्या  अंजली संतोष राठोड,वय ११ वर्षे,प्रतीक्षा मधुकर पवार वय १२ वर्षे,व ओमकार रामदास पवार वय ११ वर्षे हे शेळ्या चारत चारत खड्याजवळ गेले असता पाय घसरुन या विहिरीत पडले त्यात तिघांचा  मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच गावातील तरुणांनी मुलांना बाहेर काढले तेंव्हा ते मृत अवस्थेत होते.तीन्ही चिमुकल्याना पाहून गावातील लहान थोरांनी हंबरडा फोडला.
या घटनेची नोंद उमरगा पोलिसांत झाली आहे.येथील सरकारी दवाखान्यात रात्री उशिरापर्यंत प्रक्रिया चालू होती. घटनेची  माहिती मिळतात बिट अंमलदार वाल्मिक कोळी,पोलीस पाटील ओमप्रकाश जगताप, सरपंच किसन हेमाला राठोड,उपसरपंच नामदेव ढगे,यांनी खटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
 
Top