उमरगा/ प्रतिनिधी-
तालुक्यातील कुंन्हाळी येथील मिल्ट्री जवान यास तू घरासमोरून मोटारसायकल का घेऊन जाऊ दिला नाहीस म्हणून आठ लोकांनी मिळून हंटर छातीवर दंडावर जबर मारहाण करून जखमी केले आणि घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आठ व्यक्ती च्या विरोधात उमरगा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
या बाबतीत चे वृत्त असे की कुंन्हाळी येथील मिल्ट्री जवान लक्ष्मीकांत काशिनाथ पाटील हा त्याच्या घरामोर थांबला होता दरम्यान रवी संतराम नरवटे हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल वेगात चालवीत होता.त्या वेळी त्याला गावात अशी वेगाने मोटारसायकल चालवू नको कोणालातरी धडक लागेल असे म्हणालो असता तू मला सांगणारा कोण म्हणून मला शिवीगाळ केली गुरुवारी दि ३० रोजी लक्ष्मीकांत हा सकाळी शेताकडे जात असताना ब्रह्मनंद बिराजदार यांच्या शेताजवळ कच्या रस्त्यावर आलो असता महेश संतराम नरवटे,रवी संतराम नरवटे,तुळशीराम साधू मुटले, ब्रह्मनंद संभाजी मुटले,रतन कलिंमान कुकुर्डे, कुलदीप लक्ष्मण भोसले,आकाश हरिबा भोसले,प्रकाश राजू कुकुर्डे हे सर्वजण मिळून आले आणि तू काल रवीला तुमच्या घरा समोरून मोटार सायकल का नेहूदिली नाहीस म्हणून मला मारहाण करण्यास सुरुवात केली लक्ष्मीकांत यांच्या फिर्यादी वरून आठ आरोपीच्या विरोधात उमरगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो हे कॉ  मिलींद साकळे हे करीत आहेत.
 
Top