उस्मानाबाद / प्रतिनिधी-
दि. 22 जुलै 2020 सायंकाळी 10:00 वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्ट नुसार    दि. 20 जुलाई 2020 रोजी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथून 76 स्वाब नमुने तपासणी साठी स्वा. रा. तीर्थ. शा. वै.  महाविद्यालय, अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले  आहे. यामध्ये ६ रूग्ण पॉजिटीव्ह तर निगेटीव्ह रिपोर्ट ७० जणांचा आहे. तर एकुण जिल्हयात २९ जणांची मृत्यू झाली आहे. ३८४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात एकुण ५८३ रूग्ण संख्या झाली आहे. त्यामुळे दि.२२ रोजी एकुण १० रूग्णांची वाढ झाली आहे.
 *पॉजिटीव्ह पेशंट ची माहिती
 *उस्मानाबाद तालुका - 04.
1) 55 वर्षीय पुरुष   रा ख्रिस्तियन इंग्लिश स्कूल जवळ, मिली कॉलनी  , उस्मानाबाद. ( अँटीजेन टेस्ट ).
2) 58 वर्षीय पुरुष, रा. 16 नं गल्ली, खाजा नगर, सोलापूर रोड,  उस्मानाबाद. (अँटीजेन टेस्ट ).
3)  28  वर्षीय पुरुष रा. गवळी वाडा, तांबरी विभाग,  उस्मानाबाद.( अँटीजेन टेस्ट ).
4) 80 वर्षीय पुरुष रा.हनुमान मंदिराजवळ, तेरखेडा ता. उस्मानाबाद. ( अँटीजेन टेस्ट ).
*उमरगा तालुका -06.
1) 56 वर्षीय पुरुष. रा.  मशालकर गल्ली,  उमरगा.
2) 30 वर्षीय महिला  रा. ,माशाळकर गल्ली,  उमरगा.
3) 17 वर्षीय, मुलगी  रा. माशाळकर गल्ली, उमरगा.
4) 36 वर्षीय पुरुष  रा. उमरगा.
5) 70 वर्षीय पुरुष रा.मुनशी प्लॉट  उमरगा.
6) 50 वर्षीय पुरुष. रा. कुंभार पट्टी, उमरगा.
* रॅपिड अँटीजेन टेस्ट्स च्या माध्यमातून 27 संशयितांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 04 
रुग्ण पॉसिटीव्ह असल्याचे निदर्शनास आले असून ते वरील यादीमध्ये त्यांचा समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे आज एकूण 10  रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.

 
Top