उमरगा/प्रतिनिधी
 उमरगा पंचायत समितीच्या उपसभापती श्रीमती फातिमा हमीद जाफरी वय ६० यांचे गुरुवारी दि ९ रोजी पहाटे  सोलापूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.दाळिंब येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अत्यं संस्कार करण्यात आले.
जाफरी यांच्या निधनाचे वृत्त समजताच आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार, सभापती सचिन पाटील, जी.प.सदस्य धनराज हिरमुके, माजी जी.प.सदस्य दिलीप भालेराव आदींनी बाबा जाफरी यांचे सांत्वन केले.दाळिंब येथील सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी यांच्या त्या आई होत्या  
 
Top