तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे गुरु (आषाढी )पोर्णिमा रविवार दि5 रोजी गुरुचरणी आदर व्यक्त करीत पारंपारिक पध्दतीने साजरी करण्यात आली.
गुरू पोर्णिमा पार्श्वभूमीवर धार्मिक वृत्तीचे भाविक रविवारी दिवसभर   श्रीतुळजाभवानी चा दारी येवुन राजमाता जिजाउ येथुन दर्शन घेवुन वारी पुर्ण केल्याचे समाधान मानुन गावी परतले,
आज तिर्थक्षेञ तुळजापूर येथील मंहत तुकोजीबुवा, मंहत वाकोजीबुवा,  मंहत हमरोजी बुवा,  मंहत मावजीनाथ बुवा , मंहत सोमवारगिरी मंहत दत्तअरण्य बुवा या आपल्या गुरू असलेल्या मठाधिशांचे आर्शिवाद घेण्यासाठी गर्दी केली होती.
अरण्य मठात गुरुपोर्णिमा उत्सव साजरा
येथील अरण्य मठांत प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमा निमित्ताने  भावसार बांधवाचा वतीने अरण्य मठातील श्री दत्त मूर्तीस अभिषेक पूजा करून व महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.
या वेळेस उस्मानाबाद जिल्ह्याचे भावसार समाज अध्यक्ष सतीश आंबुरे, उपाध्यक्ष मिलिंद चाडगे,  सुधीर शेळके, नंदकुमार लांडे, सतीश आकुडे, धनंजय हिबारे, महेश खुरुद, बबलू सरवदे, अंबादास माळवदकर ,अमर शेळके व समाजाचे अध्यक्ष संजय खुरुद इत्यादी उपस्थित होते. शेवटी महाप्रसाद म्हणून लाडू वाटप करण्यात आले.

 
Top