तुळजापूर/ प्रतिनिधी-
 जिल्हयातील बहुचर्चित बनलेल्या तुळजापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदावर असलेले मंगरुळ पंचायत समिती चे सदस्य चित्तरंजन सरडे यांनी आपल्या उप सभापती पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर कुणाची निवड होणार याची उत्सुकता लागली आहे ,
तुळजापूर पंचायत समिती च्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 18पैकी 10जागा मिळवुन बहुमत मिळवल्याने सभापती पदी काँग्रेस चे शिवाजी गायकवाड विराजमान झाले होते त्यांची मुदत संपल्याने  त्यांनी राजीनामा दिला होता नंतर
सराटी पंचायत समिती गणाचा  काँग्रेस च्या सदस्या विमलाबाई अप्पाराव  मुळे यांनी काँग्रेस मधुन भाजपा आ. राणाजगजितसिंहपाटील यांच्या गटात प्रवेश केला. व काँग्रेसचे चिवरी पंचायत समिती गणाचे सदस्य कोरे यांचे सदस्यत्व  जातपडताळणीत रद्द झाल्याने काँग्रेसचे आठ सदस्य राहिले व भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या कडे नऊ सदस्य झाले.
त्या नंतर काँग्रेस मधुन आलेल्या विमल मुळे  यांना  सभापती पदाची उमेदवारी दिली गेली व त्या निवडून आल्या येथील  काँग्रेस ताब्यातील पंचायत समिती भाजपा आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या ताब्यात आली. त्यानंतर उपसभापती पदावर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक मंगरुळ पं.स सदस्य चित्तरंजन सरडे यांची उपसभापती पदी निवड झाली त्यांचा कार्यकल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला असुन त्याच जागेवर कुणाची  वर्णी लागणार याचा निर्णय आ. राणाजगजितसिंहपाटील घेणार आहेत सध्या तरी काक्रंबा गणाचे  पंचायत समिती सदस्य शिवाजी गोरे यांचे उपसभापती पदासठी नाव आघाडीवर असल्याचे समजते.आ.राणाजगजितसिंहपाटील यांच्या पंचायत समिती  सदस्यांना उपसभापती पदी निवड करुन सर्व सदस्यांना उपसभापती पदावर संधी देण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

 
Top